सी के टी संकुलात ध्वजवंदन

सी के टी संकुल नवीन पनवेल येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन सोहळा मोठया उत्साहात पार पडला, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे वाईस चेअरमन मा. श्री वाय. टी देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले

कार्यक्रमाची प्रस्तावना इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री संतोष चव्हाण यांनी केली. यावेळी हर घर तिरंगा या उपक्रमात सीकेटी च्या विद्यार्थायांचा उत्स्फूर्त सहभाग होता तसेच ९ ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थीयांना पंचत्रण शपथ देण्यात आली तसेच १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या तिन्ही दिवशी सिकेटी संकुलात ध्वजवंदन केले गेले असे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे माननीय वाय. टी. देशमुख यांनी विद्यार्थीयांना देशाचे अप्टोप्रहर संरक्षण करणाऱ्या सैनिकांची आठवण ठेवा असे सांगत, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत प्रगती पथावर दौडत असून आपणही या प्रगतीत आपले योगदान देऊयात असे सांगितले सी के टी मराठी माध्यम विद्यार्थीयांनी सुरेल राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वजगीत तसेच देशभक्ती गीत सादर केले. पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्यू कॉलेज अशा विविध विभागातील विद्यार्थीयांनी वेशभूषा, गीत गायन, भाषण, नृत्य असे विविध रंगी कार्यक्रम सादर केले.

यावेळी सर्व विभाग प्रमुख ज भ शिप्र संस्थेचे संचालक संजय भगत, मा. श्री मागु, विद्यार्थी पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जूनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री आनंद कुलकर्णी यांनी के