First Prize – Quiz Competition

भारत विकास परिषद, पनवेल शाखा यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सी. के. ठाकूर इंग्रजी माध्यमाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत तनिष्क राणे आणि सौम्य चॅटर्जी या दोन विद्यार्थ्यांनी सि.के.टी चे प्रतिनिधत्व केल. ही प्रश्नमंजूषा ‘भारत को जानो’ या विषयावर आधारित होती. पनवेलमधील १६ शाळांमधून’ ५ वेगवेगळ्या राउंडमध्ये प्रतिस्पर्ध्याना मात देत तनिष्क आणि सौम्य ने हे यश संपादित केले आहे

गेले काही दिवस आपल्या देशाचा इतिहास आणि चालु घडामोडींवर आधारित विषयाचा या विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला होता. समाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक श्री. मनोज मातंग आणि वर्षा वारे यांनी या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. पर्यवेक्षिका निरजा अदुरी यांनी ही मुलांना विशेष मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी सांगितले की विद्यार्थ्यामधे बुद्धीमत्ता असतेच परंतु अशा शालाबाह्य स्पर्धामधून या बद्धीमत्तेला पैलू पाडले जातात. बुद्धीमत्तेचा कस लागतो आणि शालेय शिक्षण नंतरच्या विविध स्पर्धा परिक्षांची आपोआप तयारी होत असते म्हणूनच अशा स्पर्धा परिक्षांसाठी आमचे विद्यार्थी आणि शिक्षक नेहमीच विशेष मेहनत घेत असतात. ” मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना प्रश्नमंजुषेच्या पुढील फेरीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.


या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री रामशेठ ठाकूर, माननीय आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर, अध्यक्ष मा. श्री अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख, सचिव मा. डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण सर, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांजकडून हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !